‘विप्रो’ला 10 हजार 500 कोटींचे विक्रमी कंत्राट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Sep-2018
Total Views |


 

 

 

नवी दिल्ली : देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेली ‘विप्रो’ला आत्तापर्यंतचे सर्वात मोठे कंत्राट मिळाले आहे. विप्रोने जाहीर केलेल्या माहितीनुसार, लाईट्स बेस सोल्युशन (एलसीसी) या अमेरिकन कंपनीशी 10 हजार कोटींहून अधिक रक्कमेचा करार झाला आहे. पुढील 10 वर्षांसाठी हा करार असणार आहे.

 

एलसीसी या कंपनीशी झालेल्या करारात विप्रो ही तंत्रज्ञान, आर्थिक, आरोग्य आणि मानवी संसाधन क्षेत्रांशी निगडीत सेवा देणार आहे. या करारामुळे कंपनीला येत्या 10 वर्षांत 160 कोटी डॉलर्स इतके उत्पन्न मिळणार आहे. इतक्या मोठ्या रक्कमेचा करार करणारी टीसीएसनंतरची कंपनी ठरली आहे. टीसीएसने डिसेंबर, 2017मध्ये इतक्या मोठ्या रक्कमेचे तीन मोठे व्यवहार केले होते.

 

लाईट्स सोल्युशनचे विशेष कार्यकारी अधिकारी ख्रिस मायकल यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, “विप्रोसोबतचा हा करार आमच्या कंपनीची सेवा नाविन्यपूर्ण आणि सर्जनशीलरित्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करेल. या करारानुसार ग्राहकांना आरोग्य, अर्थ आणि मानव संसाधन या क्षेत्रांतील सेवा डिजिटल मंचावर देण्यासाठी विप्रोची मदत होणार आहे.”

 

डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे विप्रोतर्फे सांगण्यात आले. विप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अबिद अली निमचवाला यांनी 2016 पासून कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा पहिला सर्वात मोठा सौदा असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@