‘लव्हरात्री’चे शीर्षक बदलले, सलमानची माघार
महा एमटीबी   19-Sep-2018

 

 

 
 
 
मुंबई : ‘लव्हरात्री’ हा सिनेमा त्याच्या शीर्षकामुळे गेले अनेक दिवस वादाचा विषय ठरला होता. नवरात्री या सणाशी हे शीर्षक मिळतेजुळते असल्यामुळे सिनेमावर टीका करण्यात आली होती. अखेर या सिनेमाचा निर्माता सलमान खानने माघार घेत सिनेमाच्या शीर्षकात किंचितसा बदल केला आहे. ‘लव्हयात्री’ असे आता या सिनेमाचे नव्याने नामकरण करण्यात आले असून ट्विटरवरून सलमानने ही घोषणा केली. ही घोषणा करताना सलमानने असा बदल करण्यामागील कारण देणे टाळले. तसेच "ही स्पेलिंग मिस्टेक नाही" असे सलमानने आपल्या टिविटमध्ये लिहिले. ‘लव्हयात्री – अ जर्नी ऑफ लव्ह’ असे कॅप्शनही देण्यात आले आहे.
 
 
  
 
 

सलमान खान या सिनेमातून त्याचा मेव्हणा आयुष शर्माला बॉलिवुडमध्ये लाँच करत आहे. २०१४ साली सलमानची बहिण अर्पिता हिच्याशी आयुष शर्मातचा विवाह झाला होता. त्यांना आहिल हा मुलगादेखील आहे. आयुष शर्मासह वारिना हुसैन ही नवोदित अभिनेत्री देखील बॉलिवुडमध्ये पदार्पण करत आहे. येत्या ५ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/