सागरिका घाटगे खेळतेय फुटबॉल!
महा एमटीबी   19-Sep-2018

 

 
 
 
 
मुंबई : अभिनेत्री मराठी सागरिका घाटगे हिने सध्या आपला मोर्चा हॉकीकडून फुटबॉलकडे वळवला आहे. सागरिका सध्या फुटबॉलचे धडे गिरवत आहे. लवकरच तिचा ‘मान्सून फुटबॉल’ हा मराठी सिनेमा येणार आहे. या सिनेमात सागरिका एका फुटबॉल संघाचे नेतृत्व करताना दिसेल. सिनेमाच्या सेटवरील सागरिकाचा गुलाबी साडीतील फुटबॉल खेळतानाच्या फोटोला सोशल मीडियावर पसंती मिळतेय.
 
 

 

 

काही गृहिणी एकत्र येऊन फुटबॉलचा एक संघ तयार करतात, अशी या सिनेमाची कथा आहे. याआधी सागरिका प्रेक्षकांना ‘चक दे इंडिया’ या हॉकीवर आधारित हिंदी सिनेमात खेळाडूच्या भूमिकेत दिसली होती. प्रीती सब्रवाल असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव होते. सागरिकाने अभिनेता अतुल कुलकर्णी सोबत ‘प्रेमाची गोष्ट’ या मराठी सिनेमात काम केले होते. त्यानंतर झहिर खानशी तिचे लग्न झाले. लग्नानंतर सागरिकाचा हा पहिला सिनेमा आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/