हाँगकाँगला लोळवले, आज पाकिस्तानची बारी
महा एमटीबी   19-Sep-2018

 

 

दुबई : आशिया चषकामध्ये काल भारताने हाँगकाँगचा २९ धावांनी पराभव केला. तर आज भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघात लढत होणार आहे. दोन्ही संघामधील हा १३० वा एकदिवसीय सामना असणार आहे. वर्षभरानंतर उभय प्रतिस्पर्धी संघांमध्ये ही लढत होणार आहे. सायंकाळी ५ वाजल्यापासून ही लढत सुरु होणार असून भारतीय संघ पाकिस्तानला लोळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. दरम्यान, हाँगकाँगला हरवून भारताने सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे.

 

गेल्यावर्षी १८ जून २०१७ रोजी भारत-पाक यांच्यात अखेरची लढत झाली होती. यामध्ये भारतीय संघाला १८० धावांनी पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघ हा पराभव विसरला नसून, याचा आज वचपा काढायच्या उद्देशाने भारतीय खेळाडू मैदानात उतरतील. आशिया चषकाचा इतिहास पाहायला गेल्यास आजपर्यंत भारताने सहा वेळा आशिया चषक जिंकला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/