अर्जुन पुरस्कार; यांच्या नावाची शिफारस
महा एमटीबी   18-Sep-2018नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. या पाठोपाठ अर्जुन पुरस्कारांसाठीच्या शिफारसींची देखील घोषणा करण्यात आली आहे. रि.जस्टिस इंदरमीत कौल कोचर यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीने २० अर्जुन पुरस्कारांसाठी २० जणांची नावे क्रीडा मंत्रालयाकडे पाठवली आहेत. या कमिटीमध्ये कौल कोचर यांच्यासोबत विमल कुमार, अश्विनी नाचप्पा, कमलेश मेहता यांचा समावेश होता.

 

राष्ट्रीय क्रीडा दिनादिवशी म्हणजे २९ ऑगस्ट रोजी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार देण्यात येतात. मात्र यावेळी आशियाई स्पर्धेमुळे या नियमात बदल करण्यात आला होता. २ सप्टेंबरला आशियाई स्पर्धा संपल्यानंतर १२ सप्टेंबर पर्यंत या पुरस्कारांसाठी नावे द्यायची अंतिम तारीख होती. आलेल्या नावातून निवडसमितीने अंतिम यादी क्रीडा मंत्रालयाला सुपूर्द केली आहे. आता २५ सप्टेंबर रोजी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

 

अर्जुन पुरस्कारासाठी यांच्या नावाची शिफारस

 

नीरज चोपडा (एथलेटिक्स), जिनसन जॉनसन (एथलेटिक्स), हिमा दास (एथलेटिक्स), एन. सिक्की रेड्डी (बॅडमिंटन), सतीश कुमार (बॉक्सिंग), स्मृति मंधाना (क्रिकेट), मनप्रीत सिंह (हॉकी), सविता पुनिया (हॉकी), कर्नल रवि राठौड (पोलो), अंकुर मित्तल (शूटिंग), राही सरनोबत (शूटिंग), श्रेयसी सिंह (शूटिंग), जी.साथियान (टेबल टेनिस), मनिका बत्रा (टेबल टेनिस), सुमित (रेसलिंग), रोहन बोपन्ना (टेनिस), पूजा कादियान (वुशु), शुभंकर शर्मा (गोल्फ), अंकुर धाम (पॅरा एथलेटिक्स), मनोज सरकार (पॅरा बैडमिंटन)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/