खेलरत्न पुरस्कारासाठी 'यांची' शिफारस
महा एमटीबी   17-Sep-2018नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत देखील या पुरस्काराच्या स्पर्धेत होता मात्र मीराबाई चानू आणि विराट कोहली हिच्या नावावर निवडसमितीने शिक्कामोर्तब केले. निवड समितीने या शिफारसी क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे पाठवल्या आहेत.

 

विराट कोहली हा क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेला खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये यापूर्वी सचिन तेंडुलकर (१९९७) आणि महेंद्रसिंह धोनी (२००७) यांना हा पुरस्कार मिळाला होता. जर निवडसमितीची ही शिफारस मान्य झाली तर विराट हा क्रिकेटमधील राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा तिसरा क्रिकेटपटू ठरणार आहे.

 

मीराबाई चानू हिने गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ४८ किलो वजनी गटातील वेटलिफ्टींग प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्याचबरोबर जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये विश्‍वविक्रम नोंदवून विजेतेपदक पटकावले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/