‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली
महा एमटीबी   17-Sep-2018


 

 

मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून चर्चित असलेला ठग्स ऑफ हिंदोस्तानया चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. येत्या दिवाळीत म्हणजे ८ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवरून यशराज फिल्म्स प्रोडक्शनने याबाबतची अधिकृत घोषणा केली. या चित्रपटाची वाट पाहून असलेल्या चाहत्यांची अखेर प्रतीक्षा संपली असून येत्या दिवाळीत त्यांना यशराज फिल्म्सची ही खास मेजवानी मिळणार आहे.

 

ठग्स ऑफ हिंदोस्तानया चित्रपटांमध्ये दिग्गज कलाकार असून आमीर खान आणि अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदाच एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. आमिर, अमिताभ यांच्यासोबतच या चित्रपटात सना शेख आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर ऐवजी लवकरच मोशन पोस्टर चाहत्यांच्या भेटीस येणार असून विजय कृष्ण आचार्य यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शिन केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/