प्रकाश आंबेडकरांची विशेषता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2018   
Total Views |
 
 
नक्षलवादी असणे आणि त्यांच्याप्रती सहानुभूती ठेवणे वेगळी बाब आहे. वंचित शोषितांचे एकमेव अजिमो शहेनशहा (स्वयंघोषित) असलेले प्रकाश आंबेडकर यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये आपले विचार प्रकट केले. नक्षलवादी आणि नक्षलवाद्यांप्रती सहानुभूती असणे या दोन्ही गोष्टींमध्ये वरवर भेद असला तरी या दोन्हीही एकमेकांच्या पूरक व्यवस्था आहेत, हे नक्कीच. कारण नक्षलवाद्यांवर त्यांच्या गुन्ह्यानुसार कारवाई झाली की, त्यांच्याप्रती सहानुभूती असणारे चवताळून उठतात. या नक्षली सहानुभूतीदारांच्यामते कोणत्याही प्रकारच्या विकासाला विरोध करत निष्पापांची क्रूरपणे हत्या करणारे नक्षली हे देशाच्या संवैधानिक न्यायव्यवस्थेपेक्षा, राज्यघटनेने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा आणि हक्कापेक्षाही मोठेच असतात. नक्षलींनी वस्त्याच्या वस्त्या निर्घृणपणे जाळल्या तरी या नक्षली सहानुभूतीकारांना सोयरसुतक नसते. उलट देशद्रोही आणि समाजविघातक कृत्य करणार्‍या नक्षलींची बाजू घेत हे नक्षली सहानुभूतीकार आपल्या खोट्या मानवतावादी मुखवट्याचा वापर करतात.
 
 

एखाद्याने कुणावर अत्याचार केला तर त्या अत्याचारी व्यक्तीच्या बाजूने कुणीही उगीचच सहानुभूतीपुर्वक उभे राहत नाही. अत्याचारी आणि त्याच्या समर्थकांमध्ये कुठेतरी काहीतरी लागेबांधे असतातच असतात. बरं, नक्षली सहानुभूतीदारांचा स्वभावच दयाळू मायाळू मानवतावादी आहे, अशी शक्यता गृहित धरूया. तरी मग या सहानुभूतीदारांना नक्षलींनी क्रूरपणे मारलेल्या निष्पापांबद्दल सहानुभूती का नसते?की त्यांची सारी सहानुभूती, मानवतावाद नक्षलींसाठी आरक्षित असते. समाजात, देशात अराजक माजवू पाहणारे नक्षली आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती असणारे समर्थक हे देाघेही समाजाच्या दृष्टिकोनातून सारखेच आहेत. एकाला झाकावे आणि दुसर्‍याला काढावे असे. त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांना नक्षली आणि नक्षलींबाबत सहानुभूती ठेवणे ही वेगळी बाब वाटत असेल तर त्यांनी स्पष्टीकरण द्यायलाच हवे. कारण नक्षली हा विषय कुणाचाही वैयक्तिक विषय नाही तर तो देशाच्या सार्वभौमत्वाला बाधा आणणारा विषय आहे. बोलताना प्रकाश आंबेडकर काही चिंतन-मनन करत असतील का, की मुँह में आया बक दिया और.. ही त्यांची विशेषता आहे?

 
 

संविधानावर भरोसा नाय का?

 

कामगार कायदे बदलविण्यासाठी राबविण्यात येत असलेली मोहीम म्हणजे शहरी नक्षलवाद आहे. हेही धक्कादायक विधान प्रकाश आंबेडकर यांचेच बरं का! आज प्रकाश आंबेडकरांनीच शहरी नक्षलवादाची व्याख्या त्यांच्या कुवतीप्रमाणे मांडली, हे बरेच झाले. कारण कालपर्यंत तर त्यांच्याच कंपूतले लोक (तेही स्वयंघोषित विचारवंत आणि मानवी हक्काबिक्काचे रक्षणकर्ते आहेत) कंठशोष करत होते की, शहरी नक्षलवाद हा प्रकारच नाही. भाजप आणि हिंदुत्ववादी लोकांनी हा नवाच शब्द शोधून काढला आहे. असो, तर प्रकाश यांच्या मतांना गांभीर्याने घ्यावे की नाही घ्यावे, हा मुद्दा असला तरी, विषय शहरी नक्षलवाद असल्याने त्यावर चर्चा तर व्हायलाच हवी. प्रकाश यांच्या मते शहरी नक्षलवाद हा कामगारांचे कायदे बदलविण्यासाठी राबविण्यात येतो. असे जर असेल तर शहरामध्ये या नक्षली विचारधारेने कोणते कामगार कायदे किती सकारात्मक आणि लोकहितवादी दृष्टीने बदलले किंवा गेला बाजार त्यासाठी प्रयत्न केले याचा कुठेही मागमूस दिसत नाही. उलट शहरभागातून 2018 जानेवारीनंतर जे तथाकथित नक्षली समर्थक पोलिसांनी पकडले. त्यांच्या कारवाया आणि त्यांचा भूतकाळ, वर्तमानकाळ पाहता या लोकांनी कामगारांच्या कायद्यासंबंधी बदल घडवून आणण्यासाठी काहीही केलेले दिसत नाही. उलट शहरी भागात नक्षलींशी संबंधित म्हणून पकडलेले हे लोक समाजसेवक, शोषित पीडितांचे रक्षणकर्ते, मानवतावादी कार्यकर्ते असा बुरखा पांघरून मार्क्सच्या ’दास कॅपिटल’ला ’कास्ट कॅपिटल’ करण्यात गुंतले होते. जातीजातींना दुभंगून समाज फोडण्यात रंगले होते. सरकार उलथवून टाकणे आणि देशाची राजकीय सत्ता येनकेनप्रकारे हस्तगत करण्याचे कुटिल डावपेच आखताना दिसले. यांची भूमिकाच आहे की, शस्त्राशिवाय हक्क मिळणार नाही. ही भूमिका रानटी संस्कृतीत ठीकच होती. पण आता भारतात संविधानानुसार चालणारी लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हक्क मागण्याचा संवैधानिक अधिकार अणि हक्कच आहे. या पार्श्वभूमीवर कामगारांचे कायदे बदलण्यासाठी शहरी नक्षलवाद राबवला जातो, हे प्रकाश आंबेडकरांचे म्हणणे एकून वाटते, प्रकाश तुमचा संविधानावर भरोसा नाय का?
 

      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@