पीएनबी घोटाळ्यावरून राहुल गांधीच अडचणीत
महा एमटीबी   14-Sep-2018


 


निरव व राहुल यांची भेट झाल्याचा शहजाद पुनावाला यांचा दावा


नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्यावरून काँग्रेसचे माजी नेते शहजाद पुनावाला यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीला राहुल गांधी सप्टेंबर २०१३ मध्ये भेटल्याचा पुनावाला यांनी ट्विटरवरून आरोप केला आहे. त्यामुळे सरकारविरुद्ध बिनबुडाचे आरोप करणारे काँग्रेस अध्यक्षांना या प्रकरणी घरचाच आहेर मिळाल्याने कोंडीत सापडले आहेत. दरम्यान, याच काळात नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांना बँकेकडून कर्ज देण्यात आल्याचा दावा देखील पुनावाला यांनी केला आहे.

 
 

पुनावाला यांनी ट्विट करून हा दावा केला आहे. ते यावेळी म्हणाले की, "नीरव मोदीला राहूल गांधी भेटल्याचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. कुराणची शपथ घेऊन मी सांगतो, की नीरव मोदीने सप्टेंबर २०१३ मध्ये एका हॉटेलमध्ये दिलेल्या कॉकटेल पार्टीत राहुल गांधी उपस्थित होते. नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहूल चेक्सी यांना त्याच काळात बँकांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज दिले होते. मी यासंदर्भात लाय डिटेक्टर टेस्ट करायलाही तयार आहे. तसेच राहुल गांधी यांना मी खुले आव्हान करतो, की त्यांनी नीरव मोदी यांची भेट नाकारुन दाखवावी. दरम्यान, याप्रकरणावरून भाजपवर काँग्रेससह विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली होती. पुनावाला यांच्या दाव्यानंतर काँग्रेस व राहुल गांधी यांचे पितळ उघडे पडले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/