अभाविपचा दिल्ली युनिव्हर्सिटीवर शानदार विजय
महा एमटीबी   14-Sep-2018


 

 

नवी दिल्ली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने (अभाविप) दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकांत बाजी मारली. विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिव पदावर अभाविपने मोठा विजय मिळवत महत्वाच्या तिन्ही पदांवर कब्जा मिळवला. या निवडणुकीसाठी दिल्लीतील ५२ केंद्रांवर मतदान झाले होते. तर रात्री उशिरा या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. आगामी काळातील निवडणुकांमुळे विद्यार्थी संघटनेच्या या निवडणुकांना महत्व प्राप्त झाले होते.

 
 
 

मतदान यंत्रांमध्ये फेरफार झाल्याच्या आरोपावरून मतमोजणी काही काळ थांबवण्यात आली होती. मात्र पुन्हा मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल समोर आले. यात अभाविपला तीन तर काँग्रेसप्रणित एनएसयुला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. या विजयानंतर संघटनेच्या अध्यक्षपदी अंकिव बेसोया, उपाध्यक्षपदी शक्ती सिंग, सह सचिवपदी ज्योती चौधरी विराजमान होणार आहेत.

 

अभाविपवर कौतुकाचा वर्षाव

 

दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकांत अभाविपने मोठा विजय मिळवल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी ट्विटरवरून शुभेच्छा देत म्हणले की, हा विजय राष्ट्रवादी विचारांचा असून देशात दुफळी निर्माण करणाऱ्यांना ही जोरदार चपराक आहे.

 


 

भाजपाच्या युवा मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्षा व खा. पूनम महाजन यांनी देखील या शानदार विजयाचा आनंद व्यक्त करत कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच निवडून आलेल्या कार्यकर्त्यांना ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/