मध्य रेल्वेची ओएचई व्हॅन रुळावरुन घसरली5 गाडया रद्द ; 7 गाडयांच्या मार्गात बदल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2018
Total Views |
 
मध्य रेल्वेची ओएचई व्हॅन रुळावरुन घसरली
5 गाडया रद्द ; 7 गाडयांच्या मार्गात बदल
जळगाव, 14 सप्टेंबर
मध्य रेल्वच्या कसारा - उंबरमाळी रेल्वे स्थानका दरम्यान ओव्हर हेड वायर दुरुस्ती व्हॅन रुळावरुन घसरल्याने कसारा - आसनगाव वाहतुक विस्कळीत झाली आहे. 14 रोजी या मार्गावरील 5 रेल्वे गाडया रद्द करण्यात आल्या आहेत तर 7 गाडयांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे, 5 गाडयांचे अंतर कमी करण्यात आले आणि 3 गाडया उशिराने धावणार आहेत.
 
 
रेल्वे वाहतुक विस्कळीत झाल्याने गाडी क्र. 12859 मुंबई-हावडा गितांजली एक्सप्रेस, 17617 मंुबई- नांदेड तपोवन एक्सप्रेस, 11026 पूणे- भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस या गाडया कल्याण, कर्जत ,पूणे, दौड, मनमाड मार्गे वळविण्यात आलेल्या आहेत.
गाडी क्र. 12165 लो.टि.ट.- वाराणसी रत्नागिरी एक्सप्रेस, 15017 लो.टि.ट. गोरखपूर – काशी एक्सप्रेस, 15467 लो.टि.ट.- गुवाहाटी एक्सप्रेस, 12553 मुंबई - लखनऊ पुष्पक एक्सप्रेस या गाडया दिवा,वसई, उधना, जळगाव, भुसावळ मार्गे वळविण्यात आल्या.
 
 
रद्द करण्यात आलेल्या गाडया
12118 /19 मनमाड - लो.टि.ट - मनमाड गोदावरी एक्सप्रेस, 22101/02 मनमाड- मुंबई- मनमाड राज्यराणी एक्सप्रेस व 51153 मुंबई- भुसावळ पॅसेंजर या गाडी रद्द करण्यात आल्या आहेत.
 
 
 11025 भुसावळ- पूणे एक्सप्रेस ही गाडी इगतपुरी पर्यंत धावेल, 12140 नागपूर- मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस ही गाडी नाशिकरोड पर्यंत जाणार आहे.12139 सेवाग्राम हि गाडी नाशिक – नागपूर अशी सुटेल. 12072 जालना- दादर जनशताब्दी एक्सप्रेस ही गाडी मनमाड पर्यंत धावेल तर गाडी क्र. 12071 ही गाडी नियमीत वेळेवर मनमाड - जालना सुटेल.51154 भुसावळ - मुंबई ही गाडी इगतपुरी पर्यंत धावेल व 12110 मनमाड- मुंबई पंचवटी एक्सप्रेस ही गाडी इगतपुरी रेल्वे स्थानकापर्यंत धावेल.
 
 
या गाडया उशिराने धावणार
12542 लो.टि.ट.- गोरखपूर एक्सप्रेस ही निर्धारीत वेळेपेक्षा 2 तास उशिराने, 11061 लो.टि.ट. मुज्जफरपूर पवन एक्सप्रेस 1 तास 45 मि. उशिराने, 11071 लो.टि.ट. - वाराणसी कामायनी एक्सप्रेस ही 2 तास उशिराने धावणार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@