'२.०' चा टीझर ठरतोय हीट!....
महा एमटीबी   14-Sep-2018

 

 
 
 
 
मुंबई : बहुचर्चित सिनेमा ‘२.०’ चा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यांत १३ कोटी लोकांनी हा टीझर पाहिला आहे. अभिनेता अक्षय कुमार व दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा हा सिनेमा यापूर्वी आलेल्या ‘रोबोट’ सिनोमाचा हा दुसरा भाग आहे. सिनेमातील अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या जागी आता अॅमी जॅक्सन प्रेक्षकांना दिसेल. अक्षय कुमार या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून रजनीकांत हे शास्त्रज्ञ व रोबोट चिट्टी अशा दुहेरी भूमिकेत दिसतील.
 
 
 
 
 
 
एका शहरातील सर्व मोबाईल गायब होतात. हे मोबाईल एका सुपरनॅचरल शक्तीने म्हणजेच खलनायक अक्षय कुमारने गायब केलेले असतात. या सुपरनॅचरल शक्तीशी लढण्यासाठी शास्त्रज्ञ रजनीकांत त्याने बनवलेल्या व संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या चिट्टी या रोबोटला शहरात पुन्हा आणण्याचा प्रस्ताव मांडतो. तो प्रस्ताव शहरातील अधिकारी मंजूरही करतात. त्यानंतर चिट्टी वर्सेस अक्षय असा सामना सुरू होतो. परंतु या लढाईत चिट्टीसाठी आणखी एक आवाहन असते. ते म्हणजे सिनेमाच्या पूर्वीच्या भागात डॅनी डेन्झोप्पा यांनी चिट्टीच्या यंत्रणेत केलेले बदल, व त्यामुळे शहराचे झालेले नुकसान. रोबोट चिट्टीचा हाच भूतकाळ त्याच्या या लढाईत त्याच्यासाठी अडथळा बनतो. हा अडथळा दूर करण्यात चिट्टीला येते का? तो खलनायक अक्षयवर मात करतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हा सिनेमा पाहूनच मिळतील. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होईल. २.० या सिनेमावर तब्बल ५४४ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. या सिनेमात आकर्षक व्हीएफएक्स इफेक्ट्सही देण्यात आले आहेत. भारतातील आतापर्यंतचा हा सर्वात महागडा सिनेमा आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/