स्वत: साकारला घरचा बाप्पा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2018
Total Views |

 

 
 
 
 
मुंबई : सेलिब्रिटींपासून ते नेते मंडळींपर्यंत अगदी सगळ्यांच्या घरोघरी बाप्पा विराजमान झाले. पण यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान एक नवीन ट्रेंड पाहायला मिळाला, तो म्हणजे आपल्या घरच्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला स्वत: आकार द्यायचा. त्यानंतर या मूर्तीची घरी स्थापना करायची. अर्थात आपल्या घरचा बाप्पा आपण स्वत: साकारायचा.
 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता राकेश बापट व दिग्दर्शक रवी जाधव या सेलिब्रिटींनी आपला बाप्पा घरीच तयार केला. हाच ट्रेंड लवकरच सामान्यांमध्येही येत असल्याचे दिसून येते. मुंबईतील काळचौकी अभ्युदर नगर येथे राहणाऱ्या तनया गावडे हिने देखील आपल्या घरच्या बाप्पाची मूर्ती स्वत: साकारली आहे. गेली दोन वर्षे ती हे करत आहे. तनया फॅशन डिझाइनिंग निमित्त पुण्यात असते. गणपती निमित्त ती सध्या मुंबईत आली आहे. ही गणपतीची मूर्ती तनयाने पुण्यातील गणेश चित्रशाळेत बनवली. तेथून ती मूर्ती जपत सांभाळत ती मोठ्या काळजीने मुंबईत घेऊन आली. गावडे कुटंबियांच्या घरचा हा गणपती दीड दिवस असतो. त्यामुळे स्वत: साकारलेल्या या बाप्पांच्या मूर्तीचे आज विसर्जन करताना तनयाने जड अंत:करणाने त्यांना निरोप दिला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@