सरसंघचालकांनी घेतली फुंडकर कुटूंबियांची भेट
महा एमटीबी   14-Sep-2018

 

 खामगाव : महाराष्ट्राचे माजी कृषी व फलोत्पादन मंत्री स्व. लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनानंतर शुक्रवारी १४ सप्टेंबर रोजी खामगाव दौऱ्या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी फुंडकर कुटुंबियांची त्यांच्या माधव नगर स्थित "वसुंधरा" निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली.

 

यावेळी लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रतिमेचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी दर्शन घेऊन फुंडकर कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी आई सुनिता फुंडकर, सागरदादा फुंडकर, आमदार ॲड. आकाशदादा फुंडकर व कुटुंबातील इतर सदस्यांशी चर्चा केली. यावेळी मोहनजी भागवत यांनी लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या सोबतच्या सहवासाबाबत काही आठवणींना उजाळा दिला व आपल्या संवेदना व्यक्त करून लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

 

      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/