चित्रपटगृहात 'ट्राफिक जॅम'
महा एमटीबी   14-Sep-2018

 
 

मुंबई : गणेशोत्सवाच्या सुट्टीनिमित्त या आठवड्यात वेगवेगळ्या जाॅनरचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये विविध जॅनर असलेले चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 

 
-मित्रों : वयात आलेल्या दोघांची हलकी-फुलकी ही कहाणी आहे. त्यातला एक आहे, जय (जॅकी भगनानी) जो इंजिनिअरींग शिकून बेरोजगार आहे. वडिलांनी त्याचं लग्न लाऊन देण्याचे ठरवलंयं आणि दुसरी अवनी (क्रितीका कामरा) जी ऑस्ट्रेलियामध्ये शिकून भारतात परत आली आहे. तिचेही वडिल तिचे लग्न लाऊन देण्याच्या तयारीत आहेत. यासह प्रतीक गांधी, नीरज सूद यांचीही प्रमुख भूमिका आहे. विक्रम मल्होत्रा यांनी निर्मिती केलेला हा चित्रपट नितीन कक्कड यांनी दिग्दर्शन केले आहे.

 

 
 
- लव्ह सोनिया : आदिल हुसैन, मृणाल ठाकूर, रिचा चढ्ढा, मनोज वाजपेयी, सई ताम्हणकर, फ्रेडा पिंटो, राजकुमार राव, अनुपम खेर, रिया सिसोदिया, डेमी मूर, मार्क डुप्लास, सनी परवार आदी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट देहव्यापाराच्या काळ्या दुनियेबद्दल भाष्य करतो. त्यातील काही प्रश्नांची उत्तरे आजही मिळत नाहीत. डेविड वोमार्कने निर्मित केलेला हा चित्रपट तबरेझ नुरानी यांनी दिग्दर्शित केला आहे.
 
 
 
 
 

 - लुप्त : आपल्या विनोदी अभियनाने प्रेक्षकांना हसवणारा अभिनेता जावेद जाफरी एका भयपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्यासह विजय राज, करण आनंद, मीनाक्षी दीक्षित, निकी वालिया, रिचा चढ्ढा आदी कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. रिचा चढ्ढा हिचे एकाच आठवड्यात दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. हनवंत खत्री, ललित किरी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून दिग्दर्श प्रभुराज यांनी केले आहे.

 

 
 
 
 
- मनमर्जियां : नावाप्रमाणेच मनमोकळेपणाने जगायण्यात आनंद मानणारी चित्रपटातील पात्रे आहेत. चित्रपटात हॉकी खेळणारी रुपी (तापसी पन्नू) एका डिजे विक्की संधुच्या (विक्की कौशल) प्रेमात पडते. घरच्यांना ही गोष्ट माहित पडते आणि चित्रपटात लंडनहून आलेल्या रोनी (अभिषेक बच्चन) यांची एंण्ट्री होते आणि चित्रपट वेगळे वळण घेतो. आनंद रायने निर्मित केलेला हा चित्रपट अनुराग कश्‍यपने दिग्दर्शित केला आहे. 
 
 

 

- हॉटेल मिलन : उत्तर प्रदेशात सुरू केलेल्या ऐंटी रोमियो स्क्वॉड यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. दोन मित्र प्रेमीयुगुलांना भेटण्यासाठी हॉटेल मिलन सुरू करतात. त्यानंतर स्क्वॉड येऊन धडकते आणि त्यानंतर सिनेमाची कथा रंगत जाते. कुणाल रॉय कपूर, झीशान कादरी, जयदीप आल्हाट, करिष्मा शर्मा आदी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाची निर्मित हरिष पटेल यांनी केली. विशाल मिश्रा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

 

याशिवाय सनी पांचोली, अपूर्वा अरोरा, शाहबाझ खान, अवतार गिल, तेज सप्रू, मुकेश रावळ आदी कलाकारांचा टर्निंग पॉईंट हा आणि शिवम तिवारी, कृतिका मिश्रा, सोफिया सिंह, हेमंत पांडे, राजकुमार कनोजिया, किर्ती सिंह, राहुल देव यांचा २२ डेज हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 
 

   माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/