सरन्यायाधीशपदी जस्टिस रंजन गोगोई
महा एमटीबी   14-Sep-2018

 

 
 
 
 
नवी दिल्ली : जस्टिस रंजन गोगोई यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती केली. जस्टिस रंजन गोगोई हे भारताचे ४६ वे सरन्यायाधीश असतील. मावळते सरन्यायाधीश दिपक मिश्रा हे २ ऑक्टोबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी जस्टिस रंजन गोगोई सरन्यायाधीश पदाचा कार्यभार सांभाळतील. ३ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर असा १३ महिन्यांचा हा कार्यकाळ असेल.
 

जस्टिस रंजन गोगोई हे मूळचे आसामचे असून त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आसामचे माजी मुख्यमंत्री होते. यापूर्वी जस्टिस गोगोई यांनी गुवाहाटी, पंजाब व हरियाणा येथील हायकोर्टात न्यायमूर्ती म्हणून काम केले आहे. तसेच २३ एप्रिल २०१२ रोजी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांनी जस्टिस गोगोई याची शिफरस केली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही शिफारस मान्य केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/