विसर्जन मिरवणुकीत डीजे डॉल्बीवर बंदी
महा एमटीबी   14-Sep-2018
मुंबई: गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बी साउंड सिस्टीमवर बंदी घालण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे. सण येत जात राहतील पण उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करून पाठ फिरवू शकत नाही अशा शब्दांत उच्च न्यायालयाने खडसावलं आहे. यामुळे विसर्जनादिवशी पारंपरिक वाद्यांचा दणदणाट पाहायला मिळेल अशी शक्यता आहे. गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे आणि डॉल्बी साउंड सिस्टमच्या वापराला मुंबई हायकोर्टाचा तूर्तास तरी नकार दिला आहे.

 

गणेश विसर्जन मिरवणुकीत मर्यादित डेसिबलपर्यंतचा आवाज ठेवला तरी पोलीस कारवाई का करत आहेत असा प्रश्न व्यावसायिक ऑडिओ आणि प्रकाश संघटनेने केला होता. कारवाई करत आमच्या व्यवसायावर गदा आणली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. डीजे व डॉल्बी साऊंड सिस्टमवर पूर्ण बंदी घातली आहे का याविषयी माहिती देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला होता. राज्य सरकारला यासंदर्भात आज भूमिका स्पष्ट करायची होती. दरम्यान न्यायालायने डीजे आणि डॉल्बीच्या वापरास तूर्तास परवानगी दिली नसून, सिस्टिमच्या वापरावर सरसकट बंदी घालणं कितपत योग्य आहे? असा सवाल विचारला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/