मध्य रेल्वे पुन्हा कोलमडली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2018
Total Views |




मुंबई: पहाटे ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन उंबरमाळी स्थानकात रुळावरून घसरली. यामुळे कसाऱ्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. पहाटेपासून रुळावरुन घसरलेली व्हॅन रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्या आणि लोकलवरही याचा परिणाम झाला आहे. कसारा ते आसनगाव यादरम्यान एकही लोकल सोडण्यात न आल्यामुळे कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आपला रोष व्यक्त करण्यासाठी संतप्त प्रवाशांनी वासिंद येथे रेल रोको केला होता. 'झालेल्या प्रकाराबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. सकाळी ११ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल असे ट्विट मध्य रेल्वेने सकाळी केले होते. परंतु अद्यापही वाहतूक सुरळीत झाली नसून काम चालू असल्याचं रेल्वेने सांगितले आहे.

 
 
 

या सर्व प्रकारामुळे, काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत. नाशिकहून निघालेली पंचवटी एक्सप्रेस देवळाली स्थानकात गेल्या चार तासापासून खोळंबली आहे. मुंबईला जाणाऱ्या अनेक नोकरदारांनी मुंबईला जाण्यासाठीं अन्य मार्ग शोधले आहेत. परंतु अन्य प्रवासी देवळाली स्थानकात अडकले आहेत.

 

गीतांजली एक्सप्रेस, नांदेड तपोवन एक्सप्रेस आणि गोरखपूर एक्सप्रेस या पुणे-मनमाड मार्गे वळवण्यात आले आहे. गोदावरी आणि राज्यराणी एक्सप्रेस या रद्द करण्यात आल्या आहेत. या सर्व बदलेल्या वेळापत्रकाची माहिती रेल्वे प्रशासन ट्विटरवरून दिली आहे.

 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@