काॅंग्रेसची कीव येते : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2018
Total Views |


 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'नमो' अॅपच्या माध्यमातून 'मेरा बुथ सबसे मजबूत' या कार्यक्रमांतर्गत गाझियाबाद, नवादा, हजारीबाग जयपूर आणि अरुणाचल प्रदेशच्या कार्यकत्यांशी थेट संवाद साधला. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संदेश देतानाच विरोधकांवर चांगलीच टीका केली.
 
 
मोदी म्हणाले कि, "माझा संदेश हा माझ्या बुथवरील प्रत्येक कार्यकत्यांसाठी आहे. आत्तापर्यंतच्या विजयातून वेळोवेळी दिसून आले आहे कि, बुथ हिच भाजपची ताकत असून त्यामुळेच तळागाळापर्यंत पक्ष पोहोचला आहे. 'आपला बूथ सर्वात मजबूत' हा संदेश कार्यकर्त्यांमध्ये पोहोचायला हवा."
 
 
संयुक्त पुरोगामी आघाडीवर टीका करताना ते म्हणाले, " संपुआ सरकारने भ्रष्टाचार हाच शिष्टाचार बनवला होता. भाजप इतरांसारख्या घोषणा देत नाही त्यांची अंमलबजावणीही करतो. 'सबका साथ सबका विकास' या घोषणेद्वारे देशातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे आमचे लक्ष आहे. कांग्रेसवर मला दया येते. ते आज विरोधकांची भूमिका निभावण्यातही फोल ठरले आहेत. काम न केल्यानेच देशाने त्यांना सत्तेतून बाहेर बसवले आहे. तरीही ते स्वस्थ बसत नाहीत. देशातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे."
 
 
    माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
 
@@AUTHORINFO_V1@@