सलमान खान पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
महा एमटीबी   13-Sep-2018

 

 


बिहार: अभिनेता सलमान खान पुन्हा अडचणीत येण्याचे चिन्ह आहेत. कारण सलमान खान विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बिहारमधील मुझफ्फरपूर कोर्टाने दिले आहेत. हा वाद आहे तो त्याच्या बॅनरखाली प्रदर्शित होणाऱ्या ‘लवरात्री’ या सिनेमामुळे. याच्या टायटलमुळे धार्मिक भावना दुखावल्यामुळे यावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळेच कोर्टाने सलमानविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या सिनेमामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत असल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.

 

कोर्टाच्या आदेशानंतर मिठानपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे सुधीर ओझा यांनी कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेत सलमान खानच्या प्रोडक्शन कंपनीच्या लवरात्री या सिनेमाशी संबंधित अन्य ७६ जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सलमान खान, लीड रोलमध्ये असलेला आयुष शर्मा, वरीना हुसेन, अंशुमान जा, राम कपूर यांची नावे आहेत. यासर्व प्रकारामुळे सलमान खान मागची कोर्टवरी काही केल्या संपेना असा दिसतंय.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/