'चार्मिंग गर्ल’चा सचिन तेंडुलकरसोबत रोमान्स?
महा एमटीबी   12-Sep-2018


 

 

 

दाक्षिणात्य अभिनेत्री श्री रेड्डीचा खळबळजनक आरोप

 

चेन्नई : कास्टिंग काऊचविरोधात आवाज उठवणारी टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्री रेड्डी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने फेसबुकवर पोस्ट करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर थेट आरोप केले आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्री चार्मी कौर हिच्यासोबत सचिनचे नाव जोडत एकच खळबळ उडवून दिली आहे. श्री रेड्डी यापूर्वी कास्टिंग काऊचविरोधात भररस्त्यात टॉपलेस झाल्याने प्रकाशझोतात आली होती.
 
 श्री रेड्डीची फेसबुक पोस्ट
 

श्री रेड्डीने यापूर्वीही अनेक गौप्यस्फोट केले असून एक वादग्रस्त अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. तिने फेसबुकवर लिहिताना म्हटले की, "सचिन तेंडुलकर ज्यावेळी हैदराबादमध्ये आला होता. त्यावेळी एका 'चार्मिंग गर्लने त्याच्यासोबत रोमान्स केला होता. यासाठी चामुंडेश्वर स्वामी यांनी मध्यस्ती केली होती. महान व्यक्ती चांगले खेळू शकतात, म्हणजेच चांगला रोमान्स करू शकतात." अशा आशयाची तिने फेसबुक पोस्ट करत सर्वांना धक्का दिला आहे. चार्मी कौर यांचं नाव न घेता तिने हे आरोप केले आहेत. त्यामुळे तिच्यावर सोशल मीडियातून मोठ्याप्रमाणात टीका होत असून सचिन तेंडुलकर व चार्मी कौर यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/