'बिग बॉस'च्या १२ व्या पर्वात दिसणार श्रीसंत
महा एमटीबी   12-Sep-2018

 

 
 
 
 
मुंबई : हिंदी बिग बॉसचे १२ वे पर्व येत्या रविवारीपासून सुरू होणार आहे. यंदाच्या बिग बॉसच्या घरातील सदस्यांच्या नावांची चर्चा रंगली आहे. या संभाव्य सदस्यापैकी एक नाव समोर आले आहे. क्रिकेटपटू एस. श्रीसंत बिग बॉसच्या घरातील स्पर्धक असणार आहे. श्रीशांतचे नाव बिग बॉसच्या १२ व्या पर्वातील स्पर्धक म्हणून जवळपास निश्चितच झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
 

काल मंगळवारी श्रीसंत त्याची पत्नी व दोन मुलांसह मुंबईत दाखल झाला. श्रीसंत बिग बॉस या रिअॅलिटी शोसाठीच मुंबईत आला आहे. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. २०१३ साली आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंत दोषी आढळला होता. त्यानंतर बीसीसीआयकडून श्रीसंतवर आजन्म बंदी घालण्यात आली. श्रीसंत यापूर्वी झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोच्या ७ व्या पर्वाचा आणि ‘खतरो के खिलाडी’च्या ९ व्या पर्वाचा स्पर्धक होता. त्यामुळे श्रीसंत ‘बिग बॉस १२’ चा स्पर्धक असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘बिग बॉस १२’ हा श्रीसंतचा तिसरा रिअॅलिटी शो असेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/