'या'साठी उभारणार श्रीदेवीचा पुतळा
महा एमटीबी   12-Sep-2018


 

 

बर्न : स्वित्झर्लंड तसे भारतीयांसाठी पर्यटनाच्या दृष्टिने लोकप्रिय ठिकाण. बॉलीवूडकरांनाही याची भुरळ पडलेलीच. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा पुतळा उभारण्याची घोषणा स्वित्झर्लंड पर्यटन उद्योगाने केली आहे. स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतांच्या निसर्गरम्य ठिकाणी श्रीदेवी यांच्या बहुतांश चित्रपटाचे चित्रिकरण झाले आहे. भारतीयांमध्ये स्वित्झर्लंडबद्दल आर्कषण निर्माण करण्यामागे श्रीदेवी यांच्या चित्रपटांचा मोलाचा वाटा असल्याचे तेथील सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
श्रीदेवी यांच्या 'चांदनी' या चित्रपटाचे शुटींग त्यावेळी करण्यात आले होते. यापूर्वी असा मान यश चोप्रा यांना मिळाला आहे. 'इटरलाकेन' या ठिकाणी त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. २०११ मध्ये त्यांना शहराचे राजदूत म्हणून मान मिळाला होता. १९६४ मध्ये राकपूर यांच्या 'संगम' चित्रपटाचे स्वित्झर्लंडमध्ये शुटींग करण्यात आले होते. त्यादरम्यान दोन दशकांहून अधिक काळ स्वित्झर्लंडमध्ये चित्रपट निर्मिती करण्यास निर्मात्यांमध्ये चढाओढ सुरू होती. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेला 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपट स्वित्झर्लंडमध्ये चित्रित करण्यात आला होता. त्यानंतर स्वित्झर्लंडमध्ये पर्यटन व्यावसायाला चालना मिळाली. त्यावेळेस तब्बल ३.२६ लाख भारतीय स्वित्झर्लंडमध्ये गेल्याची नोंद आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/