'काशिनाथ घाणेकर’ मध्ये असा आहे सोनालीचा लूक
महा एमटीबी   11-Sep-2018

 


 
 
 
मुंबई : ‘आणि... काशिनाथ घाणेकर’ या सिनेमातील आणखी एका कलाकाराचा लूक प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही या सिनेमात कोणत्या भूमिकेत दिसणार अशी चर्चा सिनेवर्तुळात रंगली होती. या चर्चेला पूर्णविराम देत अभिनेते सुबोध भावे यांनी काल आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सोनाली कुलकर्णींचा या सिनेमातील लूक प्रदर्शित केला आहे.
 

‘आणि... काशिनाथ घाणेकर’ या सिनेमात सोनाली कुलकर्णी या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. मराठी सिनेरसिकांच्या व मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या मनात सुलोचना दीदींबद्दल नितांत आदर आहे. सुबोध भावेंनी सोनाली कुलकर्णी यांचा सुलोचना दीदींच्या भूमिकेतील फोटो असलेले या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे.

 
 
 

यापूर्वी सुबोध यांनी अभिनेते सुमीत राघवन यांचा डॉ. श्रीराम लागूंच्या भूमिकेतील फोटो ट्विट केला होता. या सिनेमाच्या नावात बदल करण्यात आला असून आता या सिनेमाचे नाव ‘आणि....डॉ. काशिनाथ घाणेकर’ असे करण्यात आले आहे. हा चित्रपट ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/