तेलगू टायटन्सच्या माजी खेळाडूचे निधन
महा एमटीबी   11-Sep-2018
 

तामिळनाडू: तेलगू टायटन्सचे माजी खेळाडू एस. महालिंगम याचा ९ सप्टेंबरला दुपारी अपघाती मृत्यू झाला. तो अवघ्या २७ वर्ष्याच्या होता. प्रो-कबड्डीमध्ये तेलगू टायटन्स संघाकडून त्याने चौथ्या पर्वात नेतृत्व केले होते. भक्कम बचाव आणि आक्रमक चढायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या महालिंगमने अनेक सामन्यांमध्ये तेलगू टायटन्सला विजय मिळवून दिला आहे.

 

तामिळनाडु राज्यातून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली होती. चौथ्या पर्वामध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती तरीही त्याला पाचव्या पर्वासाठी कुठल्याही संघाकडून बोली लावण्यात आली नव्हती. तर सहाव्या पर्वत महालिंगम याच नाव खेळाडूंच्या यादीत समाविष्ट करण्यात आले नव्हते.

 

एस. महालिंगम याचा जन्म १९९१मध्ये तामिळनाडू राज्यात चेन्नम्मानूर येथे झाला होता. त्याने मध्य प्रदेश आणि भोपाळ आर्मीकडून खेळात होता. तो एक अतिशय उत्तम असा बचावात्मक अष्टपैलू कब्बड्डीपटू होता. त्याच्या अकाली जाण्याने क्रीडाक्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/