...आणि राजसाहेब रस्त्यावर उतरलेच नाहीत!
महा एमटीबी   11-Sep-2018


 

 
मुंबई : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला मोठ्या जोशात पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे स्वतः मात्र आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेच नाहीत. एकीकडे काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेस व इतर अनेक पक्षांचे वरिष्ठ नेते रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना, सभा घेत असताना राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्याने मात्र घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर आणि साहेब मात्र घरीच, असे चित्र पाहायला मिळाले. तसेच, मनसेची भूमिका स्पष्ट करणारी पत्रकार परिषदही राज यांनी आपल्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानीच घेतली. यामुळे समाजमाध्यमांसह अनेक माध्यमांतून सर्वसामान्य नागरिकांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली, तसेच त्यांची खिल्लीही उडवली.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/