एसटी चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना बढतीत आरक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2018
Total Views |

 

 
मुंबई : एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना लिपिक-टंकलेखक या पदासह वर्ग-३ मधील बढती प्रक्रियेमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी याबाबत निर्णय जाहीर केला आहे. एस. टी महामंडळात सध्या कार्यरत असलेल्या चालक-वाहक, सहाय्यक, शिपाई, या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना येथून पुढे लिपिक-टंकलेखक या पदासह वर्ग-३ मधील बढती प्रक्रियेमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत.
 
 
चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. सध्या एस. टी महामंडळात सुमारे १ लाख ४ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी ६० टक्के कर्मचारी चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई अशा विविध चतुर्थ श्रेणी पदावर कार्यरत आहेत. आतापर्यंत अनेक कर्मचारी एकाच पदावर रुजू होऊन, ३०-३५ वर्ष सेवा बजावून त्याच पदावर निवृत्त झाले आहेत. वेतनवाढ सोडल्याल त्यांना वरिष्ठ पदावरील बढती प्रक्रियेत कोणतेच स्थान नव्हते. यापुढे या कर्मचाऱ्यांना प्रचलित नियमाप्रमाणे शैक्षणिक अर्हता व सेवा ज्येष्ठतेनुसार लिपिक-टंकलेखक पदासह वर्ग-३ मध्ये बढती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ग-३ पदाच्या एकूण भरती प्रक्रियेतील २५ टक्के जागा अशा प्रकारे भरण्यात येणार आहेत. दरम्यान, या निर्णयामुळे कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@