अटल महाआरोग्य शिबिरासाठी कटिबद्ध व्हा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2018
Total Views |

शिबीरपूर्व रुग्ण तपासणी मोहीम उद्घाटनप्रसंगी ना.डॉ. सुभाष भामरे यांचे प्रतिपादन

धुळे, १० सप्टेंबर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे येथे १६ सप्टेंबर रोजी विनामूल्य अटल महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू रुग्णांना ही चांगली संधी आहे. धुळे जिल्ह्यात आयोजित केलेले अटल महाआरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होऊ या, असे आवाहन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी येथे केले.
 
 
धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयालगतच्या मैदानावर १६ सप्टेंबर रोजी अटल महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिबीरपूर्व रुग्ण तपासणी मोहिमेचे उद्घाटन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्या हस्ते आज जिल्हा व स्त्री रुग्णालयाच्या आवारात आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. या डॉ. भामरे म्हणाले की, अटल महाआरोग्य शिबिरासाठी देशभरातील नामवंत शल्यचिकित्सक, विशारद उपस्थित राहणार आहेत. ते रुग्णांच्या विविध विकारांची तपासणी करून औषधोपचार आणि आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रिया करतील. तपासणी, औषधोपचार आणि शस्त्रक्रिया मोफत होतील.
जिल्ह्यातील नव्हे तर जिल्ह्यालगत असलेले अमळनेर, पारोळा, मालेगाव, सटाणा या तालुक्यातीलही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या संधीचा लाभ घ्यावा. अटल महाआरोग्य शिबीर हे एक दिवसाचे शिबीर असले तरी यामध्ये ज्या रुग्णांवर छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतील त्यांच्यासाठी पुढील चार महिने ह्या शिबिराची टीम पाठपुरावा करून रुग्णांना दिलासा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा व स्त्री रुग्णालयात तपासणी करून नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सांगळे यांनी केले. डॉ. पाटील यांनी शिबीर पूर्व रुग्ण तपासणी मोहिमेची सविस्तर माहिती दिली.
 
 
या होणार तपासण्या
अटल महाआरोग्य शिबिरात नेत्र, अस्थिव्यंग, हृदयरोग, मेंदूरोग, शस्त्रक्रिया, मूत्ररोग, प्लास्टिक सर्जरी, कान- नाक- घसा, स्त्री रोग, कर्करोग, दंतरोग, श्वसन विकार, क्षयरोग, ग्रंथीचे विकार, लठ्ठपणा, मानसिक आरोग्य, त्वचा व गुप्तरोग, जेनेटिक विकार आदी विकारांवरील तपासणी करून औषधोपचार, शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शिबिरात सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या, एक्स- रे, सोनोग्राफी, ईएमजी, ईसीजी, २- डी इको, ईईजी, मॅमोग्राफी (स्तनाच्या कॅन्सरची तपासणी), पी. एफ. टी. तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@