अनुभूती स्कूलच्या ‘ज्ञानानुभूती’, ‘विज्ञानानुभूती’ वास्तूचे उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2018
Total Views |

पद्मश्री भवरलालजी जैन यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

 
https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
जळगाव, १० सप्टेंबर
अनुभूती शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असलेले वातावरण भवरलालजी जैन यांच्या दूरदृष्टीतून उभारण्यात आलेले आहे. इथे घडणारे विद्यार्थी उद्याच्या भारताचे समर्थ नागरिक बनतील, असा विश्वास माजी न्यायमूर्ती आणि गांधी रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी व्यक्त केला.
 
 
अनुभूती निवासी शाळेत उभारण्यात आलेल्या ज्ञानानुभूती या अत्याधुनिक वास्तूच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. चे संस्थापक अध्यक्ष डॉ. भवरलाल जैन यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण जयपूर फूटचे जनक पद्मभूषण डॉ. डी. आर. मेहता यांच्या हस्ते तर विज्ञानानुभूती या आगळ्या-वेगळ्या प्रयोगशाळेचे उद्घाटन अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
 
 
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, संघपती दलूभाऊ जैन, गिरधारीलाल ओसवाल, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यगार, कविवर्य पद्मश्री ना. धों. महानोर, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, डॉ. सुभाष चौधरी, अनुभूती स्कूलचे प्राचार्य जे. पी. राव आदी उपस्थित होते.
अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना आणि वाचनालय गीत सादर केले. तनया या विद्यार्थिनीने भवरलालजी जैन यांच्या पुस्तकाबद्दल असलेले प्रेम चित्रफितीच्या माध्यमातून सादर केले. रोनक चांडक याने श्यामची आई पुस्तकाबाबत मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्वरानुभूती आणि अनुभूती शाळेच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
 
‘ज्ञानानुभूती’ची वैशिष्ट्ये
अनुभूती स्कूलच्या परिसरात उभारण्यात आलेल्या ज्ञानानुभूती वास्तूत ग्रंथालय, कॉन्फरन्स रूम, स्मार्ट क्लास रूम, भाषा दालन, दोन परीक्षा सभागृहे, ऑडिटोरियम आहे.
 
विज्ञानानुभूतीचे वैशिष्ट्ये
विज्ञानानुभूती या आगळ्या-वेगळ्या दालनामध्ये विज्ञानावर आधारित विविध प्रयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक वृत्ती जोपासली जावी, त्यांच्या कल्पकतेला वाव मिळावा, हा या विज्ञानानुभूतीचा उद्देश आहे.
 
 
https://www.facebook.com/Tarunbharatjal/ 
 
@@AUTHORINFO_V1@@