होमियोपॅथीची मुलभूत तत्वे : औषध सिद्धता - (भाग ३)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Sep-2018
Total Views |

 


 
 
होमियोपॅथीक ‘औषध सिद्धता’ म्हणजेच ‘Drug Proving’ बद्दल आपण मागील दोन भागांपासून माहिती घेत आहोत. आजच्या भागातही या ‘औषध सिद्धते’विषयी आपण काही उपयुक्त अशी माहिती जाणून घेऊया... ‘औषध सिद्धते’साठी निसर्गातील वनस्पती क्षार व प्राणिजन्य पदार्थ या सर्वांचा वापर करण्यात येतो. यावेळी ‘औषध सिद्धते’साठी या पदार्थांवर काही प्रक्रिया करण्यात येतात.
 

1) देशी उगमाच्या वनस्पती : या वनस्पतींचा ताजा रस काढला जातो व त्यात औषधी अल्कोहोल अतिशय थोड्याप्रमाणात मिसळला जातो; जेणेकरून तो रस खराब होऊ नये आणि असा रस हा सिद्धकर्त्यांना ठराविक मात्रेत दिला जातो.

2) परदेशी उगमाच्या वनस्पती : या वनस्पतीचे एकतर चूर्ण बनवले जाते किंवा अर्क बनविला जातो आणि नंतर हे चूर्ण व अर्क थोड्याप्रमाणात पाणी मिसळून सिद्धतेसाठी वापरले जातात.

3) क्षार : क्षारांपासून जी औषधे बनतात, त्यांची सिद्धता करताना ते क्षार त्यावेळी पाण्यात मिसळून घेतले जातात.

4) शुल्क व कमकुवत औषधी पदार्थ: जर औषधी वनस्पती या आपल्याला शुष्क अवस्थेतच मिळाल्या व त्यांची शक्ती कमकुवत असेल, तर अशावेळी अशा वनस्पतींचे बारीक तुकडे करून त्यावर उकळलेले पाणी ओतले जाते व पाण्यात थोडा वेळ ठेऊन मग लगेचच त्याचे सेवन केले नाही, तर या औषधी वनस्पतीमधील औषधी गुणधर्म नष्ट होण्याचा संभव असतो. कारण, अशा वनस्पती लगेच आंबण्याची व कुजण्याची प्रक्रिया सुरू होते.म्हणूनच ‘औषध सिद्धते’साठी वरील सर्व काळजी घ्यावी लागते. नुसते औषध बनवून चालत नाही, तर या औषधांची सिद्धता किती व कुठल्या मात्रेत करायची, हे देखील फार महत्त्वाचे असते.  

 

अतिशय शक्तिशाली व प्रखर औषधे : शक्तिशाली औषधे सिद्ध करताना अतिशय सूक्ष्म मात्रेत सिद्ध करावी लागतात, अन्यथा त्याचा सिद्धकर्त्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. उदा. सर्पविष हे अत्यंत औषधी गुणधर्म असलेले असते. या विषावर प्रक्रिया करून त्याचे विषारी गुणधर्म काढून, औषधी गुणधर्म वाढविले जातात. तरीही अशी शक्तिशाली औषधे फार कमी मात्रेमध्ये सिद्ध केली जातात.साधारण शक्तीची जी औषधे असतात, ती त्या मानाने जरा जास्त मात्रेमध्ये द्यावी लागतात.कमकुवत शक्तीची औषधे ही संवेदनशील व नाजूक सिद्धकर्त्यांवर सिद्ध केली जातात. कारण, या कमकुवत औषधाची लक्षणे व चिन्हे संवेदनशील माणसांवर लवकर दिसून येतात. मूळ अपक्व अवस्थेतील औषधांचा परिणाम शरीरावर नीट दिसून येत नाही; म्हणून त्या औषधांची अंतर्गत शक्ती वाढवण्यात येते. यालाच ‘पोटेटायझेशन’ असे म्हणतात. याबाबत आपण पुढे माहिती घेणारच आहोत. अशी शक्ती वाढवलेली औषधे मग कमी मात्रेमध्ये सिद्धकर्त्यांना बरेच दिवस ही थोड्या थोड्या वेळांनी दिली जातात. जर काही औषधांची लक्षणे नीटपणे दिसून येत नसतील, तर काही जास्त मात्रासुद्धा दिल्या जातात व त्यामुळे लक्षणे व्यवस्थित दिसू लागतात. औषधांवर मात्रा दिल्यामुळे त्रास होऊ शकतो. औषध सिद्धकर्त्यांना दिल्यानंतर काही काळानंतर त्यांच्यामध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल हे अतिशय बारकाईने तपासले जातात व त्याची व्यवस्थितपणे नोंद केली जाते या ‘symptom recording’च्या बद्दल आपण पुढील भागात माहिती घेणार आहोत. 

 
 
                                                                             - डॉ. मंदार पाटकर
 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
@@AUTHORINFO_V1@@