‘व्यापारी महायुद्धा’चा भडका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Sep-2018   
Total Views |



 


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे महाशय कधी काय करतील, याचा नेम नाही. त्यामुळे त्यांच्या निर्णयाबद्दल अंदाज न बांधलेलाच बरा. सध्या चालू असलेल्या ‘जगाच्या पाठीवर’ ट्रम्प आणि व्यापारयुद्ध काय आहे? ट्रम्प यांनी जागतिक व्यापार परिषदेला काय इशारा दिला, हे थोडक्यात जाणून घेऊ...


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जागतिक व्यापार संघटनेवर भडकले असून “जागतिक व्यापार परिषदेने आम्हाला नीट वागणूक दिली नाही, तर आम्ही संघटनेतून बाहेर पडू,” असा इशाराच त्यांनी दिला आहे. ’अमेरिका फर्स्ट’चा नारा देत सत्तारुढ झालेले ट्रम्प हे आपल्या मनासारखं नाही झालं की लगेच काढता पाय घेत असल्याचे प्रसंग गेल्या अनेक महिन्यांपासून जगासमोर आले. जागतिक व्यापार संघटना अमेरिकेबाबत दुटप्पी भूमिका घेत असल्याचे सांगत, ट्रम्प यांना महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या हक्कांच्या संरक्षणाची जास्त काळजी लागली आहे. आता हे हास्यास्पद आहे की गांभीर्याने घ्यायचे, हे येणारा काळच ठरवेल. कारण, ट्रम्प यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून आणि निवडून आल्यानंतर आजपर्यंत सतत वाद निर्माण करत आले आहेत, तर कधी सर्वांना बुचकळ्यात टाकणारे निर्णय घेत आले आहेत. त्यामुळे हे महाशय कधी काय करतील, याचा नेम नाही. त्यामुळे त्यांच्या निर्णयाबद्दल अंदाज न बांधलेलाच बरा. सध्या चालू असलेल्या 'जगाच्या पाठीवर’ ट्रम्प आणि व्यापारयुद्ध काय आहे? ट्रम्प यांनी जागतिक व्यापार परिषदेला असा इशारा का दिला, हे थोडक्यात जाणून घेऊ...

 
 अमेरिका आणि जागतिक व्यापार परिषदेचा वाद?
 

जगभरात चालणारा व्यापार एका छताखाली यावा, कोणावर अन्याय होऊ नये म्हणून 1994 मध्ये जागतिक व्यापार परिषदेची स्थापना करण्यात आली होती. या परिषदेचे स्वतःचे नियम आहेत आणि ते त्याचे पालन करणं हे सहभागी देशांचं कर्तव्य असतं. मात्र, अमेरिका हे नियम पाळण्याच्या मानसिकतेत नाही. कारण, त्यांचं असं म्हणणं आहे की, ”परिषद दुजाभाव करत आमच्यावर अन्याय करतेय.” यामुळेच अमेरिका आणि जागतिक व्यापार परिषदेमध्ये वारंवार खटके उडत आहेत. अमेरिकेत होणाऱ्या जागतिक व्यापार परिषदेच्या संदर्भातील न्यायालयीन प्रकरणावर सुनावणी करण्यासाठी न्यायाधीशांची नियुक्ती करणं आवश्यक असतं. मात्र, जागतिक व्यापार परिषद अमेरिकेच्या धोरण प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत असल्याचे सांगत ट्रम्प प्रशासन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यामध्ये अडचणी निर्माण करत आहे. स्वतःच्या मर्जीनुसार चालता येत नाही, यासाठी अमेरिका ही आडमुठी भूमिका घेऊन आडकाठी करताना दिसते. याची सुरुवात अलीकडे अमेरिकेने चीनकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त आयात कर लावण्यापासून झाली होती आणि याच प्रकरणात जागतिक व्यापार परिषदेत अमेरिकेची पीछेहाट झाल्याने हे खटके उडत आहेत.

 
 व्यापारयुद्धाची सुरुवात कशी झाली?
 

अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये सध्या व्यापारयुद्धाचा भडका उडाला आहे. सध्या या युद्धाची तीव्रता जरी लहान असली तरी येत्या काळात याचा मोठा भडका उडू शकतो, असा इशारा अमेरिकेने चीन आणि जागतिक व्यापार परिषदेला दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे युद्ध चालू असून यात अनेक देश प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. एकमेकांच्या वस्तूंवर आयात कर लावून या वादाच्या ठिणग्या टाकल्या जात आहेत. या वादाची सुरुवात प्रामुख्याने अमेरिका आणि चीन या दोघांमध्ये सुरू झाली होती. चीनकडून आयात होणाऱ्या 34 अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांवर सुमारे 25 टक्के अतिरिक्त आयात कर लागू करून अमेरिकेने ही तर सुरुवात असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे अमेरिका आगामी काळात 16 अब्ज डॉलरच्या आयातीवर अतिरिक्त आयात कर लादणार असल्याचे अर्थतज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. अमेरिकेचा हा हल्ला गपगुमान सहन करेल तो चीन कसला? चीनने ही जशास तसे भूमिका घेत अमेरिकेकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त आयात कर आकारण्यास सुरुवात केली आहे. एकंदरीत, भडकलेले व्यापारी युद्ध, पेटलेली अमेरिका, चीन आणि यात भरडले जाणारे देश यांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि व्यापार परिषदेवर काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@