शेअर मार्केटची परिभाषा
महा एमटीबी   09-Aug-2018


 


मागील लेखात आपण शेअर बाजारात काय करावे आणि काय करू नये, यावर चर्चा केली होती. पण, शेअर मार्केट अभ्यासपूर्वक समजून घेताना काही प्राथमिक शब्दावलीची ओळख करुन घेणे गरजेचे आहे.

 

1) Averaging of Down : आपण एखादा शेअर विकत घेतला आणि त्याची किंमत खाली गेली, तर परत खालच्या किमतीला खरेदी करून, आपल्या शेअरची किंमत कमी करणे याला ‘Averaging of Down’ असे म्हणतात. ही फक्त एक संज्ञा नसून एक अतिशय प्रसिद्ध व सर्वमान्य ऑप्रेशन प्रणाली आहे.

 

2) Bear Market : जेव्हा मार्केटमध्ये विक्रीचा जोर अधिक असतो आणि खरेदीदार कमी असतात, तेव्हा त्याला Bear Market म्हणतात.

 

3) Bull Market : जेव्हा मार्केटमध्ये खरेदीचा जोर अधिक असतो आणि विक्रेते कमी असतात, तेव्हा त्याला ‘Bull Market’ म्हणतात.

 

4) Blue Chip Stocks : मोठ्या इंडस्ट्रीज, ज्या शेअर मार्केट लीड करतात, त्या कंपन्यांना चांगल्या परताव्याचा, एक फार चांगला रेकॉर्ड असतो. आपण जर या कंपनीचे शेअर घेतलेले असतील आणि जरी त्याची किंमत कमी झाली, तरीही प्रथम घाबरण्याची गरज नसते आणि या कंपन्यांचा परतावा फार चांगला असतो. म्हणून या कंपन्यांचे शेअर घेणे नेहमीच कमी जोखमीचे असते .

 

5) Beta : म्हणजे, स्टॉकची किंमत आणि मार्केटमधील मोमेंट यांचा एकमेकांशी असलेला गणिती संबंध. उदा. कंपनीचा ‘बेटा’ २ असेल, तर त्याचा अर्थ मार्केट जेव्हा १ पॉईंटची मोमेंट देतो, तेव्हा हा स्टॉक २ पॉईंटची मोमेंट देतो.

 

6) Hedge: आपला तोटा एका मर्यादेत ठेवण्याचा हा एक प्रभावी उपाय आहे. जी Postion आपण घेतली आहे, त्याच्या बरोबर उलट सौदा करून मार्केटमध्ये उभे राहणे आणि loss न book करणे, यासाठी ही ट्रेडिंगची पद्धत फार लोकप्रिय आहे. किमतीमधील फरक हाच आपला नफा असतो.

 

7) Index : ट्रेडर आणि पोर्टफोलिओ ऑपरेटर याचा संदर्भ घेऊन निर्णय घेतात. उदा. निफ्टी ५० इंडेक्स मोजण्यासाठी सुरुवातीचे वर्ष १९९५ धरतात आणि इंडेक्स १००० धरले जाते. म्हणून निफ्टी ५० = १९९५ नंतर ५० विशिष्ट स्टॉकमध्ये आलेले कॅपिटल (१००० /१९९५ साली असलेली मार्केट कॅपिटलची किंमत)

 

8) Moving Average : एखाद्या विशिष्ट स्टॉकची, एका विशिष्ट काळातील सरासरी किंमत

 

9) Portfolio : एखाद्या गुंतवणूकदाराच्या मालकीच्या वेगवेगळ्या गुंतवणुका.

 

10) Rally : अचानकपणे आलेला किमतीतील बदल.

 

11) Volatility : हा आकडा स्टॉकचा किमतीमधील फारकत दर्शवतो. जास्त ट्रेडिंग होणार्‍या स्टॉकच्या किमतीत दैनंदिन उच्च आणि नीच ही तफावत खूप असते. या तफावतीलाच ते ‘Volatility’ असे म्हणतात.

 

12) Volume : एका विशिष्ट काळामधील त्या स्टॉकची झालेली खरेदी आणि विक्री.

 

13) Bid and ask price : एखादा स्टॉक, ज्या किमतीला एखाद्या खरेदीदाराला विकत घ्यायची इच्छा असते ती किंमत म्हणजे ‘Bid price’ आणि ज्या किमतीला विकायची इच्छा असते ती किंमत म्हणजे ‘ask price’

 

14) intra day trading : खरेदी आणि विक्री हे दोन्ही व्यवहार त्याच दिवशी पूर्ण करणे.

 

15) Moving Average : एखाद्या विशिष्ट स्टॉकची, एखाद्या विशिष्ट कालावधीतील सरासरी किंमत. स्टॉक मार्केटमध्ये २० दिवस, ५० दिवस आणि २०० दिवस या खूप लोकप्रिय ‘Moving Average’ आहेत.

 

16) Portfoilo : एखाद्या गुंतवणूकदाराकडे त्याने विकत घेतलेले वेगवेगळ्या स्टॉकचे संकलन.

 

17) Rally : स्टॉकच्या किमतीत अचानकपणे झालेली किंवा होत असलेली वाढ वा घट. सर्वसामान्यपणे १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ इथे अपेक्षित असते.

 

18) Sector : समान उद्योगात असलेल्या समभागांचा गट. उदा. तंत्रज्ञान क्षेत्रातील, ज्यात अ‍ॅप्पल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. काही व्यापारी एखाद्या विशिष्ट क्षेत्रात व्यापार करणे पसंत करतात, जसे की ऊर्जा, कारण ते उद्योगाला चांगल्याप्रकारे ओळखतात आणि शेअर किंमत चढउतारांबाबत चांगल्या प्रकारे भाकीत करू शकतात. आपल्या स्टॉक मार्केटमध्ये रोज वापरले जाणारे शब्द, आपल्याला समजल्यामुळे होणारे व्यवहार व त्याचा अर्थ, आपल्या सर्वांना लवकर कळतील.  एक चांगला व्यापारी निर्माण होण्यासाठी ते अतिशय आवश्यक आहे. सिक्युरिटीजच्या व्यवहाराची गुंतागुंत समजून घेण्यासाठी वेळ लागतो, परंतु वरील शब्द सरावाने व अभ्यासाने, आपल्या रोजच्या शब्दसंग्रहाचा एक भाग बनतील. मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही स्टॉक मार्केटच्या शब्दावर स्वतःचे क्विझ घेऊ शकता, जोपर्यंत आपण त्यांच्याशी अत्यंत परिचित नाही. शेअर मार्केट आपल्याला गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय आहे.  सतत नवनवीन मार्गाने येत असलेले भांडवल, वाढते गुंतवणूकदार यामुळे या क्षेत्राला लक्ष्मीचे वरदान लाभले आहे. अभ्यासाने, सरावाने, मनन आणि चिंतन करून आपणही यामधून चांगला नफा कमावू शकतो आणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच. पुढच्या आठवड्यात शुक्रवारी पुन्हा भेटू. तोपर्यंत वरील शब्दांशी आपण परिचित झाले असालच.

 

-विजय घांग्रेकर

84258 94515