करूणानिधी यांच्यावर मरीना येथे अंत्यसंस्कार
महा एमटीबी   08-Aug-2018
 
 
 
 
 
मद्रास : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) पक्षाचे अध्यक्ष एम. करूणानिधी यांच्यावर अंतिम विधी हा मरीन समुद्रतटावरच होणार असे मद्रास उच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. त्यामुळे आता एम. करूणानिधी यांच्यावर अंतिम विधी मरीन समुद्रतटावरच होणार असे स्पष्ट झाले आहे. आज सकाळी आठ वाजता या मद्रास उच्च न्यायालयात यावर निर्णय घेण्यात आला. 
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सध्या एम. करूणानिधी यांना श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचले आहेत. तसेच दक्षिण सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत आणि कमल हसन हे देखील एम. करूणानिधी यांना श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचले आहेत. आज सकाळपासून चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्री तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती यांनी देखील एम. करूणानिधी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आहे.