इराणवर अमेरिकेची नवीन बंधने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2018
Total Views |



वॉशिंग्टन डी.सी. :
अमेरिका आणि इराण यांच्यातील अणु करारावरून सुरु झालेल्या वादानंतर अमेरिकेने इराणवर नवीन आर्थिक बंधने लादली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याविषयी घोषणा केली असून येत्या नोव्हेंबर महिन्यापासून इराणवर नवीन बंधने लागू करण्यात येतील.

अमेरिकेने अत्यंत उद्दात भावनेने इराणबरोबर अणु करार केला होता. परंतु इराणने सध्या या कराराचा गैरवापर करत असून यामधील कोणत्याही अटीचे पालन करत नाही. त्यामुळे हा अणु करार जागतिक शांततेसाठी घातक ठरण्याची शक्यता आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यामुळे इराणबरोबरच्या या अणु करारातून अमेरिका बाहेर पडत आहे. परंतु तरी देखील इराणबरोबर असलेले मैत्रीपूर्ण संबंध टिकण्यासाठी म्हणून अमेरिका इराणबरोबर नवा अणु करार करण्यास देखील तयार आहे, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. तसेच २०१५ पूर्वीची सर्व बंधने पुन्हा एकदा इराणवर लावण्यात येत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.



दरम्यान यासंबंधाची सर्व कारवाई लवकरच पूर्ण करण्यात येणार असून येत्या ५ नोव्हेंबरपासून इराणवर ही बंधने लागू करण्यात येईल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
@@AUTHORINFO_V1@@