व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींवर ड्रोनहल्ला, ६ जण अटकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2018
Total Views |

काराकास : व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्यावर ड्रोन हल्ला केल्याच्या आरोपाखाली व्हेनेझुएला पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. या सहा आरोपींनीच मादुरो यांना मारण्याचा प्रयत्न केला असून ड्रोन हल्ल्याचा कट देखील यांनीच रचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. परंतु याविषयी अजून ठोस माहिती पुढे आलेली नसून या सर्व प्रकरणाचा तपास केला जात आहे.
व्हेनेझुएलाची राजधानी काराकास येथे काल एका सैनिका कार्यक्रमाला संबोधित करत असताना मादुरो यांच्यावर ड्रोन हल्ला करण्यात आला होता. ड्रोनला स्फोटके बांधून हा ड्रोन कार्यक्रमस्थळी पाठवण्यात आला. परंतु सुदैवाने मादुरो यांच्या जवळ येण्याअगोदरच त्याचा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजानंतर मादुरो यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. त्यामुळे मादुरो यांना कसल्याही प्रकारची दुखापत झाली नाही. परंतु कार्यक्रमामध्ये असलेले काही नागरिक आणि सैनिक मात्र या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले. यानंतर मादुरो यांनी हा हल्ला आपल्याला ठार करण्यासाठीच केला गेल्याचा दावा केला व त्यानंतर या हल्ल्याच्या चौकशीचे आदेश दिले. राष्ट्रपती आदेशानंतर पोलीस दलांनी या प्रकरणाची चौकशी करत एका रात्रीमध्ये सहा ताब्यात घेतले आहे.

@@AUTHORINFO_V1@@