वरीष्ठ काँग्रेस नेते आर. के. धवन यांचे निधन
महा एमटीबी   06-Aug-2018


 
 
नवी दिल्ली :  काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे विश्वासपात्र नेते आर. के. धवन यांचे आज निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली येथील बी.एल. कपूर रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
 
रजिंदन कुमार धवन यांनी अनेक वर्ष इंदिरा गांधी यांचे स्वीय सचिव म्हणून कार्य केले. ते केंद्रीय मंत्री देखील होते. त्यांनी अनेक वर्षे निष्ठेने काँग्रेस पक्षाचे कार्य केले. गेल्या आठवड्यातील गुरुवारी आर.के. धवन यांना वृद्धापकाळाच्या विविध समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
 
 
 
 
 
 
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी धवन यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच संजय निरुपम, ज्योतिरादित्य सिंधिया, राज बब्बर, राजीव सातव यांच्यासह अनेक दिग्गज मंडळींनी धवन यांना श्रद्धांजली अर्पण करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.