संसदेत आज दोन महत्वाच्या विधेयकांवर चर्चा
महा एमटीबी   06-Aug-2018
 
 
 
 
 
नवी दिल्ली : संसदेत आज दोन महत्वाच्या विधेयकांवर चर्चा करण्यात येणार आहे. लोकसभेत आज एससी-एसटी अत्याचार संरक्षण विधेयकावर चर्चा करण्यात येणार असून या विधेयकासाठी मतदान होणार आहे. तर राज्यसभेत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे विधेयक सादर करण्यात येणार असून यावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा लोकसभा आणि राज्यसभेसाठी महत्वाचा ठरणार आहे. 
 
 
गेल्या कित्येक दिवसांपासून मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचे विधेयक रखडले होते. केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात हे विधेयक मांडले होते. या सुधारणा विधेयकावर सध्या जोर असल्याने यावर आज राज्यसभेत चर्चा करण्यात येणार आहे.