फुटबॉल स्पर्धा : भारतीय खेळाडूंचे चांगले प्रदर्शन
महा एमटीबी   06-Aug-2018
 
 
 
 
 
स्पेन : स्पेनमध्ये सुरु असलेल्या कोटिफ कप फुटबॉल स्पर्धा यामध्ये भारताच्या २० वर्षांखालील मुलांनी चांगली कामगिरी करून दाखविली आहे. अंडर-२० संघामध्ये भारताच्या खेळाडूंनी अर्जेंटिनाला २-१ अशा फरकाने मागे टाकत या स्पर्धेत इतिहास रचला आहे. भारतीय संघाने पहिल्यांदाच स्पेनच्या संघाला पराभूत करत स्पर्धेत मजल मारली आहे. 
 
 
 
 
 
 
भारतीय फुटबॉल खेळाडूंनी ही कामगिरी केली असल्याने त्यांच्यावर सगळ्या बाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. राजकीय, बॉलीवूडक्षेत्रातील लोकांनी याची दखल घेत त्यांना पुढच्या खेळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.