प्रत्येक क्षणात आनंद शोधतेय : सोनाली बेंद्रे
महा एमटीबी   05-Aug-2018


 
 
अमेरिका :  आज जागतिक मैत्री दिन म्हणजेच फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने कर्करोगाला झुंझ देणाऱ्या सोनाली बेंद्रेने पुन्हा एकदा एक सकारात्मक संदेश देत आपला फोटो शेअर केला आहे. यामध्ये किमो मुळे केश जरी गेले असले तरी सोनालीची आयुष्य जगण्याची जिद्द मात्र तिळमात्र कमी झालेली नाही, हे दिसून येत आहे. आपल्या मैत्रिणी म्हणजेच अभिनेत्री गायत्री परांजपे ओबेरॉय आणि सुजेन खान हिच्या सोबत तिने फोटो टाकत स्वत:च्या परिस्थिती विषयी माहिती दिली आहे.
 
 
 
 
 
ती सांगते..

" ही मी आहे, आणि या क्षणी मी खूप आनंदी आहे. जेव्हा मी आता असे म्हणते तेव्हा लोक मला विचित्र नजरेने बघतात. मात्र हेच सत्य आहे. मी खरंच आनंदी आहे, कारण आता मी प्रत्येका एका क्षणात आनंद शोधतेय. हे खरंय की अनेकदा त्रास होतो, दु:ख होतं, मात्र मला जे आवडतंय ते मी करते. माझ्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवण्यात मला आनंद मिळतो. मी स्वत:ला खूप भाग्यवान मानते की मला असे मित्र मिळाले आहेत, ज्यांच्यामुळे माझी ही परिस्थिती सुसह्य झाली आहे, जे मला कधीच एकटे सोडत नाहीत. माझ्यावर प्रेम केल्याबद्दल खरंच थँक यू" असे म्हणत तिनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 
"आता मला तयार व्हायला खूप वेळ लागत नाही, कारण वेळ घालवण्यासाठी केस नाहीत ना.." असे म्हणत तिने गमंत करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. या परिस्थितीला अत्यंत सकारात्मकपणे तिने हाताळले असल्याचे दिसून येते.
 
कर्करोगाशी झुंझ देणे अत्यंत कठीण असते, मात्र तरी देखील तिने अत्यंत धैर्याने आणि सकारात्मकपणे ही झुंझ देण्याचे ठरविले आहे. सोनालीच्या आरोग्याच्या जलद प्रगतीसाठी तिचे चाहते देवाला प्रार्थना करत आहेत.