बॅडमिंटन चॅम्पियनशिप : सिंधूची उपांत्य फेरी धडक
महा एमटीबी   04-Aug-2018
 
 
 
 
 
नानजिंग (चीन) : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने चीनमध्ये सुरु असणाऱ्या बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मागच्या वर्षीच्या पराभवाचा बदल घेत सिंधूने जपानच्या नोजोमी ओकुहारा हिला मोठ्या गुण फरकाने पराभूत करत बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपली जागा कायम केली आहे. 
 
 
सिंधूने नोजोमी ओकुहारा हिला पहिल्या डावात २१-१७ ने तर दुसऱ्या डावात २१-१९ अशा मोठ्या गुणांच्या फरकाने मागे टाकले आहे. ५८ मिनिटे हा खेळ चालला असून मी देखील काही कमी नाही असे सिंधूने दाखवत नोजोमी ओकुहारा हिला मागच्या खेळाची आठवण करून दिली.