रितेश-जेनेलिया पुत्र राहिलचे तैमुरला फिटनेस चॅलेंज!
महा एमटीबी   30-Aug-2018 

 

मुंबई : काही दिवसांपूर्वी नेतेमंडळींपासून ते खेळाडूपर्यंत अनेकांनी एकमेकांचे फिटनेस चॅलेंज स्वीकारले होते. या फिटनेस चॅलेंजचे सोशल मीडियावरून अनेक व्हिडिओ लोकांना पाहायला मिळाले. पण आता या फिटनेस चॅलेंजमध्ये आणखी एक भर पडली आहे. बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या बच्चेकंपनीमध्ये फिटनेस चॅलेंजचा हा खेळ रंगणार असल्याचे दिसते. रितेश व जेनेलिया देशमुख यांच्या लहानग्या राहिलने तैमुरला फिटनेस चॅलेंज दिले आहे.
 
 

 

 
जेनेलियाने आपल्या ट्विटर हँडलवरून राहिलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत राहिल मोठ्या स्फुर्तिने एका भिंतीवर चढताना दिसतो. हा एक खेळ असून इनडोअर रॉक क्लाइंबिंग असे या खेळाचे नाव आहे. राहिलला रितेशने हे फिटनेस चॅलेज दिले होते. वडिलांनी दिलेले हे चॅलेंज राहिलने पूर्ण करून तर दाखवलेच, पण त्याचबरोबर राहिलने त्याच्या वयाच्या इतर स्टारकिड्सना हे फिटनेस चॅलेंज दिले आहे. सलमानचा भाचा अर्थात अर्पिता व आयुष शर्माचा मुलगा आहिल, करण जोहरची मुलं यश व रुही, तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य आणि सैफ-करिनाच्या तैमुरला त्याने हे चॅलेंज दिले आहे. या व्हिडिओच्या शेवटी राहिल या सर्वांची नावे घेऊन त्यांना चॅलेंज करताना दिसतो. एवढ्या लहान वयात फिटनेस चॅलेंज स्वीकारणारा राहिल हा पहिला स्टारकिड ठरला आहे. राहिलचे हे फिटनेस चॅलेंज या स्टारकिड्सपैकी कोणकोण स्वीकारणार हे मात्र पाहण्याजोगे असेल.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/