आशियाई क्रीडा स्पर्धेत सिंधूची ऐतिहासिक कामगिरी!
महा एमटीबी   28-Aug-2018


 

 

जकार्ता : आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये पी.व्ही. सिंधूने बॅटमिंटनमध्ये रौप्यपदक कमावले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य मिळवणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. एकीकडे सिंधूने ही कामगिरी केली तर दुसरीकडे तिरंदाजीमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघानेही रौप्यपदक मिळवले आहे.
 
 
तिरंदाजीमध्ये भारतीय महिला संघाचा सामना दक्षिण कोरियाशी होता. या सामन्यात विजयाच्या समीप असूनही महिला संघाचा पराभव होऊन संघाला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. तिरंदाजीत पुरुष संघाच्या बाबतीतही हेच घडले. त्यांनी रौप्यपदक मिळवले. भारताीय खेळाडूंच्या या कामगिरीमुळे सध्या त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून पी. व्ही. सिंधुचे कौतुक केले आहे.
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/