२५ मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत राही सरनोबतला सुवर्ण
महा एमटीबी   22-Aug-2018




 


जकार्ता : आशियाई क्रीडा स्पर्धेत राही सरनोबतने सुवर्णपदक पटकावले आहे. २५ मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत तिने ही कामगिरी केली आहे. पहिल्या फेरीपासूनच राही अग्रेसर ठरली. थायलंडच्या प्रतिस्पर्धीने खेळाडूने तिच्यावर मात करण्याचा खूप प्रयत्न केला. दोघांना समान गुणही मिळाले. त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये शूटऑफ घेण्यात आले. या शूटऑफमध्ये राही ३-२ या गुणसंख्येने प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात केली. राही सरनोबतला मिळालेल्या सुवर्णपदकामुळे भारताने कमावलेल्या पदकांत भर पडली आहे. भारताला मिळालेले हे ४ थे सुवर्णपदक आहे.

 

 

 
आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताने ११ पदके जिंकली आहेत. ४ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्यपदक भारताच्या खात्यात आहेत. १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रमवारीत भारत ७ व्या स्थानी आहे. ३० सुवर्ण, १८ रौप्य आणि १२ कांस्यपदक मिळवून चीन या क्रमवारीत अग्रस्थानी आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/