...अखेर भारतीय संघाने कसोटी विजय मिळवला!
महा एमटीबी   22-Aug-2018


 

इंग्लंड : नॉटिंघममधील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर २०३ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासोबत भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धच्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत आपले खाते उघडले असून सध्या भारतीय संघ १-२ ने पिछाडीवर आहे. मालिकेत मिळालेला पहिला विजय कर्णधार विराट कोहलीने केरळमधील पूरग्रस्तांना समर्पित केला आहे.
 

तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडच्या दिवसअखेर ९ बाद ३११ धावा झाल्या होत्या. यामुळे अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी एका विकेटची गरज होती. ही औपचारिकता ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने पूर्ण करत भारतीय संघाने इंग्लंडच्या भूमीत कसोटी सामन्यात ४ वर्षांनी विजय मिळवला आहे.

 

दरम्यान, या सामन्यात भारताच्या हार्दिक पांड्या व जसप्रीत बुमराने अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या सामन्यात ५ बळी टिपून इंग्लंडच्या खेळाडूंना सळो की पळो करून सोडले होते. पहिल्या डावात ९७ तर दुसऱ्या डावात १०३ धावा करणारा भारतीय कर्णधार विराट कोहली सामन्याचा मानकरी ठरला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/