सौरभ चौधरीने दिले भारताला आणखी एक सुवर्णपदक
महा एमटीबी   21-Aug-2018
 

 

जकार्ता: आशियाई स्पर्धा २०१८ मध्ये भारताला तिसरे सुवर्णपदक मिळाले आहे. नेमबाज सौरभ चौधरीने ही सुवर्ण कामगिरी केली आहे. १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सौरभ चौधरीने हे सुवर्णपदक पटकावले आहे. सौरभ अवघा १६ वर्षांचा आहे. सौरभसोबत या स्पर्धेत अभिषेक वर्माने भारताला कांस्य पदक मिळवून दिले आहे. १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सौरभ व अभिषेकने अंतिम फेरीत स्थान मिळवले होते.

 

सौरभने या स्पर्धेत जपानच्या स्पर्धकावर मात करत २४०.७ गुणांची कमाई केली. तर अभिषेक वर्माने २१९.३ गुण मिळवून कांस्यपदक पटकावले. आशियाई खेळ २०१८ च्या स्पर्धांमध्ये भारताने मिळवलेले हे तिसरे सुवर्णपदक आहे. आतापर्यंत या स्पर्धेत नेमबाजांनी मिळविलेले हे पाचवे पदक आहे. यापूर्वी अपूर्वी चंडेला आणि रवि कुमार यांनी १० मीटर एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक मिळवले, तर दुसऱ्या दिवशीतच्या स्पर्धेत दिपक कुमारने रौप्यपदक मिळवले होते. अभिषेकने कांस्यपदक व सौरभने सुवर्णपदक मिळवून यश संपादन केले आहे. त्यामुळे आशियाई क्रीडा स्परधेतील भारतीय नेमबाजांनी केलेली ही कामगिरी खरंच उल्लेखनीय म्हणावी लागेल.

 

यावर्षीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण ९ पदकांची कमाई केली आहे.

 

अपूर्वी चंडेला – १० मीटर एअर रायफल स्पर्धा - कांस्यपदक

 

रवि कुमार - १० मीटर एअर रायफल स्पर्धा - कांस्यपदक

 

दिपक कुमार - १० मीटर एअर रायफल स्पर्धा – रौप्यपदक

 

अभिषेक वर्मा - १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धा – कांस्यपदक

 

सौरभ चौधरी - १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धा – सुवर्णपदक

 

विनेश फोगाट – महिला कुस्ती स्पर्धा (फ्री स्टाइल) – सुवर्णपदक

 

बजरंग पुनिया - पुरुष कुस्ती स्पर्धा (फ्री स्टाइल) – सुवर्णपदक

 

संजीव राजपूत – ५० मीटर रायफल शूटिंग स्पर्धा – रौप्यपदक

 

लक्षय शेओरान – ट्रॅप मेन शूटिंग - रौप्यपदक