आशियाई स्पर्धेत दिपक कुमारला रौप्यपदक
महा एमटीबी   20-Aug-2018
 


जकार्ता : २०१८ च्या आशियाई स्पर्धेत भारताने आपले तिसरे पदक मिळवले आहे. १० मीटर एअर रायफल शूटिंगमध्ये नेमबाज दिपक कुमारने रौप्य पदक मिळवले आहे. चीनच्या होरन येंगशी दिपक कुमारचा सामना होता. दिपक कुमारने या सामन्यात २४७.७ गुण प्राप्त केले.

 
 
 
 
भारताकडून रवी कुमार आणि दिपक कुमार या दोघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आशियाई स्पर्धेच्या पहिल्या दिवशी रवी कुमारने भारताला कांस्य पदक मिळवून दिले होते. परंतु दुसऱ्या दिवशीच्या खेळात त्याला चौथे स्थान मिळाले. आशियाई स्पर्धेत दिपक कुमारने प्रथमच रौप्य पदक पटकावले आहे.