इंग्लंड वि. भारत : विराटने पुन्हा एकदा ठरवले मीच ‘बेस्ट’
महा एमटीबी   20-Aug-2018
 
 
 
 
भारत-इंग्लंड कसोटी सामन्यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली याचे झुंजार शतक थांबायला काही नाव घेत नाही आहे. आज देखील विराटने दमदार शतक झळकावत मीच या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करून दिले आहे. आजच्या सामन्यात विराटने तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील विराटने शतक पूर्ण करत त्याचे २३ शतकं पूर्ण केली आहेत.  सध्या या सामन्यात भारत २८२ धावांसह ५ बाद स्थितीत खेळत आहे. सध्या इंग्लंड  ४४७ धावांनी पुढे आहे. 
 
 
 
विराटच्या दमदार शतकी खेळीमुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत विराट कोहली हा सध्या पहिल्या क्रमांकावर आला असून ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ याला देखील त्यांने मागे टाकले आहे. विराटच्या या कामगिरीमुळे सध्या सर्व स्तरातूनच त्याचे कौतुक केले जात आहे. आयसीसीने नुकतीच आपली ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये कसोटी क्रमवारीतील उत्तम फलंदाजाचा यादीमध्ये विराटला पहिला क्रमांक देण्यात आला आहे. इंग्लंडविरोधातील आपल्या शतकी खेळीमुळे विराटच्या खात्यात सध्या ९३४ गुण जमा झाले आहे.