'कॉफी विथ करन'चे नवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस
महा एमटीबी   19-Aug-2018

 
 
मुंबई :  प्रसिद्ध दिग्दर्शक करण जौहर याचा गाजलेला कार्यक्रम "कॉफी विथ करन" आता पुन्हा एकदा नवीन पर्व घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेली अनेक वर्ष नेहमी नवीन पर्वासह हा कार्यक्रम खूप गाजतोय. या कार्यक्रमामुळे अनेक चर्चांचा जन्म झालाय तर अनेकांच्या अनेक खाजगी गोष्टी या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाहेर आल्या आहेत, त्यामुळे चाहते या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघतायेत.
 
या आधी 'कॉफी विथ करन' चे एकूण ५ पर्व आले आहेत. दरवर्षी या मध्ये नवीन कलाकारांची भर पडते. तर शाहरुख खान, आमिर खान, काजोल, करीना कपूर यांच्या सारखे काही कलाकार आहेत ज्यांना दरवर्षी या कार्यक्रमात बोलवण्यात येते. या कार्यक्रमांमध्ये करण जोहार सिनेसृष्टीतील कलाकारांसोबत मनसोक्त गप्पा मारतो. २१ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता कॉफी विथ करनच्या ६ व्या पर्वाचा पहिला भाग दाखवण्यात येणार आहे. स्टारवर्ल्ड वाहिनीवर हा कार्यक्रम दाखवण्यात येईल. 
 
 
 
 
आलिया भट्टच्या सामान्य ज्ञानासंबंधी झालेला वाद विवाद असू देत नाहीतर कंगना रणावत ने उठवलेला परिवारवादासंबंधी प्रश्न, हे सर्व वाद विवाद या कार्यक्रमांमधील गप्पांमधूनच बाहेर आले आहेत. त्यामुळे यंदाच्या पर्वात काय नवीन असणार आहे, तसेच आणखी कोण नवीन कलाकार यामध्ये सहभागी होणार आहे, याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे.