कुपवाडा येथे तीन दहशतवाद्यांना कंठस्थान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2018
Total Views |


 
कुपवाडा (जम्मू काश्मीर) :  जम्मू काश्मीरच्या कुपवाडा येथेतंगधार सेक्टर मध्ये आज भारतीय सेनेला ३ दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात यश आलं आहे. शनिवारी रात्री काही दहशतवाद्यांनी भारताच्या समेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय सेनेने चोख कामगिरी करत हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही, तसेच या कारवाईत तीन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात भारतीय जवानांना यश मिळाले आहे.
 
यावेळी सुरक्षा रक्षकांनी या दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले मात्र त्यांनी ते नाकारले त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्वरित कारवाई केली. दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार सुरु केला मात्र याला चोख प्रत्यूत्तर देत भारतीय जवानांनी गोळीबार सुरु केला आणि या गोळीबारात तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं.
 
गेल्या काही दिवसांमध्ये कुपवाडा भागात मोठ्या प्रमाणात दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. तसेच सुरक्षा रक्षक देखील त्यांच्या या प्रयत्नांना अयशस्वी ठरवत आहेत. यासाठी या भागांमध्ये भारतीय सेनेकडून मोठ्या प्रमाणात शोधमोहिम राबविण्यात येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@