एशियन गेम्स : अपूर्वी चंदेला आणि रविची अपूर्व कामगिरी
महा एमटीबी   19-Aug-2018
भारताने जिंकले पहिले पदक 
 
 
 
 
मेक्सिको :  मेक्सिको येथे सुरु असलेल्या एशियन्स गेम्स मध्ये भारताने आपले खाते उघडले असून अपूर्वी चंदेला आणि रवि कुमार यांनी नेमबाजीत पहिले पदक जिंकले आहे. १० मीटर एयर राइफल मिश्र गटात अपूर्वी आणि रवि यांनी अपूर्व अशी कामगिरी करत कांस्य पदक पटकावलं आहे.
 
 
 
 
ताईपेई संघानं सुवर्ण पदक तर चीनने रजत पदकावर शिक्कामोर्तब केला. रवि कुमार यांच्यासाठी हे पदक अत्यंत महत्वपूर्ण ठरलं आहे. २८ वर्षीय या नेमबाजाने २०१४ मध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावले होते, त्यानंतर २०१८ मध्ये झालेल्या कॉमन वेल्थ खेळांमध्ये देखील त्याने व्यक्तिगत स्पर्धेत कांस्य पदकावर आपले नाव कोरले होते. तसेच अपूर्वी चंदेला हिने २०१४ मध्ये कॉमनवेल्थ खेळांमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते.
 

 
 
 
सध्या सुरु असलेल्या एशियन गेम्स मध्ये या जोडीने 'क्वालिफिकेशन' फेरीमध्ये कोरियानंतर दुसरे स्थान पटकावले होते. यामध्ये त्यांनी ८३५.३ अंक मिळवले. भारतीय खेळाडू मनु भास्कर आणि अभिषेक वर्मा यांचे पदक अगदी थोड्या फरकाने मुकले.